Ad will apear here
Next
‘भाजप’च्या महत्त्वाच्या समित्यांमध्ये महाराष्ट्राचे सहा जण
नारायण राणेंना पक्षाच्या संकल्पपत्र समितीमध्ये मुख्य स्थान


मुंबई : लोकसभा निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाने (भाजप) जय्यत तयारी सुरू केली असून, वेगवेगळ्या मुख्य कामांसाठी महत्त्वपूर्ण व्यक्तींच्या जबाबदाऱ्याही निश्चित करण्यात आल्या आहेत. यांमध्ये महाराष्ट्रातील नितीन गडकरी, पियुष गोयल, प्रकाश जावडेकर, नारायण राणे, मंगल प्रभात लोढा आणि विनय सहस्रबुद्धे या सहा जणांचा समावेश आहे. ‘भाजप’च्या केंद्रीय कार्यालयाने लोकसभा निवडणूक अभियानाच्या विविध समित्यांची ही सूची जाहीर केली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या जबाबदाऱ्यांसाठी ‘भाजप’ने अनेक समित्या बनवल्या आहेत. त्यात पक्षाचे संकल्पपत्र समितीमध्ये (निवडणूक घोषणापत्र समिती) महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना मुख्य स्थान मिळाले आहे. राणेंबरोबरच रेल्वे मंत्री पियुष गोयलही संकल्पपत्र समितीमध्ये आहेत. केंद्रीय रस्तावहन मंत्री नितीन गडकरींना सामाजिक व स्वयंसेवी संघटना संपर्क समितीमध्ये, राज्यसभा सांसद विनय सहस्रबुद्धेंना साहित्य निर्माण समितीमध्ये, तर केंद्रीय मनुष्यबळ विकास प्रकाश जावडेकर यांना प्रबुद्ध संमेलन समितीमध्ये घेतले आहे.

महाराष्ट्रातील ज्येष्ठ आमदार मंगल प्रभात लोढा असे एकमेव नेते आहेत ज्यांन दोन समित्यांमध्ये स्थान दिले गेले आहे. लोढा यांना लोकसभा निवडणुकीमध्ये प्रवास व विमान समिती तसेच, लाभार्थी संपर्क समितीमध्ये स्थान मिळाले आहे. या सूचीत माजी मुख्यमंत्री नारायण राणेंचे नाव भुवया उंचावणारे आहे. ते ‘भाजप’च्या कोट्यातून राज्यसभेवर गेलेले सांसद आहेत.

‘भाजप’ अध्यक्ष अमित शाह यांनी आपल्या निवडणूक अभियान संघात राणे, गडकरी, गोयल, जावडेकर, सहस्रबुद्धे आणि लोढा या दिग्गज नेत्यांना लोकसभा निवडणुकीचे व्यवस्थापन, प्रचार व संचालनमध्ये स्थान देऊन ‘भाजप’कडून लोकसभा निवडणुकीची तयारी किती जोरदार सुरू असल्याचे दाखवून दिले आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/NZUOBW
Similar Posts
‘मंत्रालय आणि राजभवनातही सार्वजनिक पार्किंग सुरू करावे’ मुंबई : ‘शहरातील भयावह ट्रॅफिक जाम व अडचणीच्या पार्किंग समस्येवर उपाय करण्यासाठी मुंबईमध्ये सरकारला मंत्रालय व राजभवनसहित सर्व सरकारी ठिकाणी सार्वजनिक पार्किंगची सुविधा सुरू केली पाहिजे,’ अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ आमदार मंगल प्रभात लोढा यांनी विधानसभेत केली आहे. मुंबईच्या नियोजनबद्ध विकासासाठी वेगळे मंत्रालयही स्थापन केले जावे
‘नोटबंदीमुळे अर्थव्यवस्था मजबूत’ मुंबई : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने उचललेल्या नोटबंदी व जीएसटीच्या पावलांमुळे देशाची अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे व काळ्या पैशाला चाप लागला आहे. ज्या लोकांचे काळ्या पैशाचे व्यवहार होते ते लोक व त्यांना पाठिंबा देणारे राजकारणी यामुळे दुःखी झाले असले, तरी हे निर्णय देशहिताचे
‘मोदी सरकारकडून जास्तीत जास्त अपेक्षा पूर्ण’ मुंबई : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या केंद्र सरकारने कमीत कमी वेळात जनतेच्या जास्तीत जास्त अपेक्षा पूर्ण केल्या आहेत,’ असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी (ता. २९) मुंबईत केले.
‘मोदी सरकारच्या कामांमुळे देशाचा आर्थिक पाया मजबूत’ मुंबई : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या पाच वर्षांत देशाच्या अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत करण्यात आला असून, त्याच्या आधारे भारत देश हा विकसित देश होण्याची आणि महाशक्ती बनण्याची आकांक्षा आपण ठेऊ शकतो,’ असे प्रतिपादन रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी केले.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language